रावणाने सीतेचं अपहरण केलं नाही, ही आहे सत्यकथा

आपल्या सर्वांना माहिती आहे की, रावणाने माता सीतेचं अपहणरण केलं होतं. त्यामुळे राम आणि रावणामध्ये युद्ध झालं. त्या युद्धात रावणाचा नाश झाला.

माता सीता पंटवटी आश्रमात असताना रावण ऋषीच्या वेशात आला आणि माता सीतेचं हरण करुन तिला लंकेत घेऊन गेला असं सगळ्यांना माहिती आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, प्रत्यक्षात सीतेचं अपहरण कधीच झालं नव्हतं आणि तिचं रक्षण भगवान श्रीरामांनी केलं होतं.

रामायणातील कथेनुसार भगवान राम सर्वज्ञ होते पण पापाचे प्रतीक असलेल्या रावणाचा नाश करणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी भविष्य पाहून हा निर्णय घेतला होता असं म्हणतात.

प्रभू रामाने प्रत्यक्ष माता सीतेला पंचवटीच्या बाहेत जतन करुन ठेवले होते. जेव्हा रावणाने सीतेचं हरण केलं तेव्ही ती एक प्रतिकृती होती.

पाप आणि अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते. म्हणूनच त्यांनी अपहरणाची घटना थांबवण्यासाठी दैवी शक्तींचा वापर केला नव्हता.

सीता हरणाची ही कथा अनेक भक्तांना आजही माहिती नाही आहे.

अनेक लोककथांमध्ये असंही म्हटलं गेलं आहे की, रावणामध्ये अनेक वाईट गुण होते मात्र तो एक महान विद्वान होता. त्याला मृत्यू देवाच्या हातून झाला पाहिजे अशी इच्छा होती.

असं म्हणतात की, रावणाला प्रभू श्रीरामाच्या बाणाने मृत्यू हवा झाला पाहिजे अशी इच्छा होती. त्यामुळे रावणाला राक्षस जन्म आणि पापांपासून मुक्ती हवी होती. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story