पावसाळ्यात अनेकदा तांदूळ आणि डाळींवर किड लागून ते खराब होतात.
तांदळातील किडपासून सुटका मिळवण्यासाठी तमालपत्र आणि सुकी कडुलिंबाची पाने डब्यात ठेवावी.
तांदळाच्या डब्यात लवंगही टाकू शकतो. त्याच्या वासाने किड पळून जाईल.
किडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी तांदूळ रेफ्रिजरेटरमध्ये देखील ठेवू शकता.
तांदळाच्या मध्यभागी लसणाच्या काही पाकळ्या देखील ठेवू शकता त्यामुळे किडे पळून जातात.
लसणाची पाकळी सुकल्यानंतर ती बदलत राहिल्याने किड आजूबाजूला देखील फिरकत नाही.
तांदळामध्ये किड दिसल्यास ते उन्हात वाळवावे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)