आयुष्यात आव्हानं आल्यास साहस आणि धैर्य तुम्हाला यातून बाहेर पडण्यास मदत करेल, हे बाप्पाकडून शिकता येतं.
प्रथम पूजन गणपती बाप्पाची स्वारी उंदीर आहे. बाप्पा आपल्याला विनम्रतेची शिकवण देतो.
बाप्पा ज्ञान आणि बुद्धीची देवता आहे. आजीवन शिकत राहण्याची शिकवण बाप्पा देतो.
मोठे कान आणि छोट्या तोंडाने जास्त ऐकणं आणि कमी बोलण्याची शिकवण बाप्पा देतो.
भौतिक आणि अध्यात्मिक कर्तव्य पार पडताना संसारीक जबाबदारी आणि आंतरिक शांतीत सामंजस्य बनवण्याची शिकवण
जसे मोठे व्हाल तसे अहंकारी न होता अधिक विनम्र होण्याची शिकवण
बाप्पाकडून दयाळू आणि क्षमाशिलता शिकायला हवी.
चांगल्या भविष्यासाठी मोठा आणि सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा बाप्पाकडून घ्यायला हवी.