पौष्टीक आणि स्वादीष्ट फळांमध्ये केळ्याचा समावेश होतो. केळी खाल्ल्याने शरीराला इंस्टंट एनर्जी मिळते.
केळी विकत घेतल्यानंतर 2 ते 3 दिवसांत त्यावर काळे डाग दिसू लागतात. अनेकजण अशी केळी निरूपयोगी समजून फेकून देतात.
पण डॉक्टर सागंतात केळी हे असं फळ आहे ज्यामुळे फक्त शरीराला पोषण मिळत नाही तर आरोग्य देखील चांगले राहते.
घरात ठेवलेल्या केळ्यांवर काळे डाग आले असतील तर अशी केळी खाल्ल्याने काही नुकसान होत नाही.
हलके डाग असलेली केळी जास्त पौष्टीक असतात. त्यात व्हिटामीन्स, मिनरल्स आणि एंटी ऑक्सिडेंट्सचे प्रमाण जास्त असते यातून भरपूर पोषण मिळते.
डॉक्टरांच्या म्हणणयानुसार तुम्ही निश्चिंतपणे अशा केळींचे सेवन करू शकता ज्यामुळे शरीराला पोषक तत्व मिळतात आणि आरोग्यही चांगले राहते.