जसं मदर्स डे, फादर्स डे साजरा केला जातो त्याचप्रमाणे 'किसिंग डे' असा सुद्धा दिवस असतो हे तुम्हाला माहित होत का?
यावर्षी किंसिंग डे 6 जुलैला साजरा करण्यात येणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का जगातील पहिला किस कोणी केला होता ?
किंसिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातसुद्धात सर्वात प्रसिद्ध म्हणजे फ्रेंच किस.
तज्ज्ञांच्या मते किस करण्याची प्रथा भारतातून सुरू झाली असावी असं म्हणण आहे. किंसिंग करण्याची सुरूवात भारतातून सुरू झाले आणि त्यानंतर विदेशी आक्रमनानंतर ते सगळीकडे पसरले अस मानण्यात येतं.
काहीवेळेस अभिनेत्रींचे किस करताना घेण्यात आलेले सीन नेहमीच चर्चेत असतात. पण मानवशास्त्रज्ञांच्या मते किसची पहिली सुरूवात अपघातानेच झाली असावी.
पण खरं सत्य तर हे आहे की किसिंगची सुरूवात प्रेमाने नाही तर मायेने झाली होती. याची सुरूवात अश्मयुगीन काळात झाली असं म्हणायला हरकत नाही.
आपल्या पुर्वजांनी म्हणजेच माकडांपासून याची सुरूवात झाली.जेव्हा एखादी आई माकडला तिच्या छोट्या बाळाला खायला घालायची त्यावेळी आई आधी स्वत: अन्न तोंडात घ्यायची आणि चावून अगदी बारीक करून बाळाला द्यायची. याला प्रीमॅस्टिकेशन फूड ट्रान्सफर असे म्हटले जाते.
आजही एखादी आई मायेपोटी सहजपणे बाळाला किस घेते. केवळ जेवण भरवतानाच नव्हे तर चिंपांझी माता इतरवेळी देखील आपल्या बाळांना किय घेतात.
यामागे मानव वंशशास्त्र टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी यांनी अभ्यास करून असा दावा केला आहे की, पुर्वीच्या काळी भेटल्यावर एकमेकांच्या शरीराचा वास घेतला जायचा.असे का करायचे याला कोणतही शास्त्रीय कारण नाही. पण वास घेतानाच ओठांचा स्पर्श होऊन मानवामध्ये किसिंगची प्रथा सुरू झाली असावी असं शास्त्रज्ञांच म्हणणं आहे.