अनेक जण नियमीत लिंबू पाणी पितात. मात्र, काही लोकांसाठी लिंबू पाणी हानीकारक ठरु शकते.
वजन कमी करण्यासाठी तसेच विविध कारणांसाठी अनेक जण लिंबू पाणी पितात.
लिंबामध्ये व्हिटॅमिन C असते. यात सायट्रिक ऍसिड देखील असते. यातील अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वांचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.
जाणून घेवूया लिंबू सरबत पिण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम.
पित्ताचा त्रास असेल तर लिंबू सरबत पिणे टाळावे.
सर्दी, खोकला असेल तर चुकूनही लिंबू सरबत पिऊ नये.
जास्त प्रमाणात लिंबू सरबत प्यायल्यास छातीत जळजळ होऊ शकते.
जास्त लिंबू सरबत प्यायल्यानेही डिहायड्रेशन होऊ शकते.
लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.