फ्रोजन मटार खाण्याचे दुष्परिणाम माहितीयेत का?

Aug 22,2024


आजकाल बऱ्याच घरांमध्ये, हॉटेलमध्ये भाजीसाठी फ्रोजन मटार वापरला जातो.


ताजे मटार खाण्याचे जसे फायदे शरीराला मिळतात तसेच फ्रोजन मटार खाल्ल्याने शरीराला अनेक नुकसान सुद्धा पोहोचते.


फ्रोजन मटारमध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेटची मात्रा जास्त असते.


फ्रोजन मटारचे सेवन जास्त प्रमाणात केले तर यामुळे वजन वाढू शकते.


फ्रोजन मटारमध्ये स्टार्चची मात्रा जास्त असते परिणामी त्याचे सेवन केल्यावर त्याचं रूपांतर हे ग्लूकोजमध्ये होतं.


डायबेटिजच्या रुग्णांनी फ्रोजन मटार खाणे शक्यतो टाळावे असा सल्ला तज्ज्ञ देतात.


फ्रोजन मटारमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. अधिक प्रमाणात फायबरचे सेवन केल्याने पोटाशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात.


फ्रोजन मटारमध्ये ताज्या मटारच्या तुलनेत कमी पोषकतत्व असतात.


फ्रोजन मटार खाल्ल्याने काहीजणांना ऍलर्जी होऊ शकते. यामुळे तोंडात खाज येणे जळजळ होणे, पोट दुखणे इत्यादी समस्या जाणवू शकतात.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story