रिझर्व बँक ऑफ इंडिया तुम्हाला 10 लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे.
तुम्हाला केवळ काही सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
90 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आरबीआयने एक क्वीज आयोजित केली आहे.
यामध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातील.
20 ऑगस्टपासून हे क्विज ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आहे.
अंडर ग्रॅज्युएटचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात.
फायनान्शियल इकोसिस्टिमबद्दल जागृकता निर्माण करणे हा यामागचा हेतू आहे.
यामुळे तरुणांमध्ये सुरक्षित ऑनलाइन व्यवहाराबद्दल जागृकता निर्माण होईल.
या क्वीजमध्ये पहिल्या नंबर आलेल्या विजेत्यास 10 लाख रुपये तर द्वितीय आलेल्याल 8 लाख रुपये बक्षिस मिळेल.
तिसऱ्या स्थानावर असलेल्या व्यक्तीस 6 लाखांचे बक्षिस मिळेल.