भाजक्या चण्यांचं सेवन नाश्तात करायला हवं. त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
भाजक्या चण्यांसोबत चुकूनही दह्याचं सेवन करू नका. त्यानं ब्लोटिंग, डायरिया आणि पोट दुखी सारख्या समस्या होऊ शकतात.
भाजलेल्या चण्यांसोबत मासे खाऊ नका. त्यामुळे डायजेस्टिव सिस्टमशी संबंधीत समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
मासे आणि भाजलेले चणे एकत्र खाल्यानं तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. मासे हे प्रोटीनचा स्त्रोत असल्याचं म्हटलं जातं.
आंबट आणि ज्युसी फळांसोबत भाजलेले चणे खाऊ नका. त्यामुळे पोट दुखीची समस्या उद्भवू शकते.
भाजलेले चणे खायचे असतील तर ते तुम्ही उपाशी पोटी खायला हवे. त्यानं तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतील. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)