काजू कतली ही खूप लोकप्रिय मिठाई आहे. दिवाळीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात मिठाई खाल्ली जाते
काजू कतली तुम्ही आरामात घरी बनवू शकता. त्यासाठी साहित्यही अगदी कमी लागेल
250 ग्रॅम काजू, 250 ग्रॅम साखर, दूध, तूप आणि सजावटीसाठी चांदीचा वर्ख
सगळ्यात पहिले काजू आणि दूध यांची एक पेस्ट तयार करुन घ्या
आता या पेस्टमध्ये साखर टाकून मंद आचेवर शिजवून घ्या. साखर वितळल्यानंतर चांगले एकजीव करुन घ्यावे
आता हे मिश्रण चांगले घट्ट झाले की एका परातीत घेवून त्यावर चांदीचा वर्ख लावून घ्या आणि वड्या पाडून घ्या.