आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
ज्यामध्ये आचार्य चाणक्यांनी कोणत्या ठिकाणी लक्ष्मी राहत नाही याबद्दल सांगितले आहे.
चाणक्य यांच्या मते, ज्या घरात अन्नाचा आदर होत नाही अशा ठिकाणी लक्ष्मी कधीच येत नाही.
तसेच ज्या ठिकाणी महिलांचा किंवा मुलांचा आदर केला जात नाही, त्याठिकाणी लक्ष्मी वास करत नाही.
जे लोक विद्वान लोकांचा अपमान करतात अशा ठिकाणाहून लक्ष्मी परत येते.
चाणक्य यांच्या मते, ज्या घरात नेहमी वाद होतात त्या कुटुंबामध्ये लक्ष्मी येत नाही.