UPI पेमेन्ट करताना तिसऱ्यालाच पैसे गेले तर काय कराल?

Diksha Patil
Dec 04,2023


आजकाल मोठ्या संख्येनं लोक यूपीआयचा वापर करतात.


अनेकदा यूपीआय करताना चूक होते आणि आपण दुसऱ्या व्यक्तीच्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर करतात.


अशा परिस्थितीत काय करायला हवं? तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर चला तुमच्या या चिंतेला दूर करूया.


कस्टमर केअरला 1800 120 1740 या क्रमांकावर फोन करा. त्यावेळी त्यांना तुमच्या ट्रान्जॅक्शनविषयी सांगतं तुमची तक्रार दाखल करा.


बॅंकेला द्याल माहिती. जर बॅंकेनं तक्रार दाखल करून घेतली नाही तर तुम्ही आरबीआयच्या वेबसाईटवरून ही तक्रार दाखल करा.


आरबीआयच्या कोणत्या वेब साईटवरून तक्रार दाखल करायची असा प्रश्न पडला असेल तर bankingombudsman.rbi.org.in ही वेब साईट आहे. असं केल्यानं तुम्हाला नक्कीच पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते.


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story