स्वयंपाक करतांना पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करतो.
बऱ्याचदा कामाच्या गडबडीत स्वयंपाक करताना काही गोष्टी कमी जास्त होत अस्तात. कधीतरी आपल्याकडून चुकुन मीठ किंवा मसाले जास्त पडतात.
यावेळी आपण ईतक्या मेहनतीने केलेला पदार्थ वाया जाण्याची शक्यता अस्ते. तिखटपणा कमी करण्यासाठी अनेक सोपे टिप्स आहेत.
रस्सेदार ग्रेव्ही भाज्यांमधील तिखटपणा कमी करायचा असेल तर त्यामध्ये दुध, दही आणि क्रिम घालावी त्यामुळे त्यातील तिखटपणा कमी होतो आणि ग्रेव्ही घट्ट होण्यास मदत होते.
सुक्या भाजिमधील तिखटपणा घालवण्यासाठी त्यात तुप किंवा बेसन घालु शक्ता.
एखाद्या पदार्थामधील तिखटपणा दुर करण्यासाठी त्यात लिंबू पिळतात नाहितर त्यात व्हिनेगर आणि आंब्याची साल देखील घातली जाते.
पदार्थात गोड मिसळल्यामुळे तिखतपणा लगेच कमी होतो त्यामुळे त्यात गूळ, साखर मिसळू शक्तो.
जर कोणती सुखी भाजी तिखट झाली असेल तर त्यात बटाट्याचे काप मिसळा त्यामुळे भाजीतील तिखटपणा कमी होतो.