ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो.
संपुर्ण जगभरात लोक दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस उत्साहात साजरा करतात.
या दिवशी ख्रिसमस ट्री डेकोरेशन आणि सांताक्लॉज या सगळ्यांमुळे आनंदाचे वातावरण असते.
ख्रिसमस या सणाला मास ऑफ क्राइस्ट या नावावरून 'ख्रिसमस' हे नाव पडलं आहे.
हा दिवस 'येशूंचा' जन्मदिवस आहे. म्हणुन 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो.
भारतातील अनेक ख्रिस्ती ख्रिसमसच्या मध्यरात्री चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात.
या दिवशी चर्च आकर्षकरित्या सजवलेले असतात.
अनेक लोक ख्रिसमसच्या सुट्टयांमध्ये फिरायला जायचा प्लॅन करतात.