प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी रात्री हार्ट अटॅक आल्याची घटना घडली. सध्या त्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र याची लक्षणं आपण समजून घेतली पाहिजेत.
हृदयाला रक्त पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसेल तर हृदय विकाराचा झटका येतो
हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांमध्ये अडथळा आल्यास, त्या ब्लॉक झाल्यास श्वास घ्यायला त्रास होतो
हृदय विकार येण्यापूर्वी छातीत कळ येते, तीव्र वेदना होतात.
याशिवाय चेहरा, पाठ अथवा डाव्या हाताला मुंग्या येतात.
हृदयाला रक्त पुरवठा होत नसले तर धाप लागते. थकवा जाणवतो. हृदयाचे ठोके वाढतात
उच्च रक्तदाब, मधुमेहींना हृदयविकाराचा धोका अधिक असतो