आचार्य चाणक्य हे महान विद्वानांपैकी एक आहेत. अर्थशास्त्रापासून ते समाजकारणापर्यंत अनेक गोष्टींचं त्यांना ज्ञान होतं.
चाणक्य यांनी चाणक्य निती लिहिली. यामध्ये त्यांनी समाजात आपलं कोण आणि परकं कोण हे कसं ओळखावं याबद्दलही लिहिलं आहे.
आपले कोण आणि परके कोण याबद्दल समजून घ्यायचं असेल तर 5 क्षण किंवा प्रसंग महत्त्वाचे ठरतात. आपलं आणि परकं होण हे दर्शवणारी 5 लक्षणं कोणती ते पाहूयात...
तुमच्यावरील संकटाच्या समयी जी व्यक्ती तुम्हाला मदत करेल ती व्यक्ती खरोखर मित्र आहे असं म्हणता येईल, असं चाणक्य सांगतात.
जी व्यक्ती तुमच्या आजारपणात सोबत असेल त्या व्यक्तीला तुमची काळजी असते, असं चाणक्य म्हणतात. अशा व्यक्तींना तुमचं हित हवं असतं हे लक्षात घ्या.
तुम्ही एखाद्या वादात किंवा संकटात अडलेले असताना जी व्यक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते तिच तुमची खरी हितचिंतक असते, असं चाणक्य म्हणतात.
तुम्ही एखाद्या कोर्टाच्या किंवा कायद्याच्या कचाट्यात आडकल्यास तुम्हाला मदत करणारी व्यक्तीच तुमचा आपला माणूस असतो असं चाणक्य यांनी सांगितलं आहे.
आर्थिक संकटाच्या काळात जी व्यक्ती तुमच्या खाण्याची किंवा पैशांची व्यवस्था करेल तिला तुमची खरोखरच काळजी असून अशा व्यक्तीच खऱ्या दोस्त असतात, असं चाणक्य सुचवतात.