डायबेटिज ही एक आरोग्याशी निगडित वाढती समस्या असून जगभरात याच्या रुग्णांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ होतं आहे.
डायबेटिज झाल्यावर रुग्णांना खाण्यापिण्यात अनेक पथ्य पाळावी लागतात. यात मुख्यत्वे साखर किंवा साखरेच्या पदार्थांचे सेवन करण्यास मनाई केली जाते.
काहीजण रुग्ण हे साखरेला पर्याय म्हणून गुळाचे सेवन करतात. पण असं करणं योग्य नाही.
गूळ हा जरी नैसर्गिक असला तरी तो साखरेचाच एक प्रकार आहे.
गुळामध्ये काही व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात मात्र मुख्यत्वे यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे ब्लड शुगर वेगाने वाढते.
डायबेटिजच्या रुग्णांना शुगर स्पाईक्स पासून वाचले पाहिजे. गूळ हा साखरे इतकाच हानिकारक ठरू शकतो.
गुळाचे सेवन करण्यापूर्वी डायबेटिजच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)