त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक लोक घरगुती आणि सौंदर्य उत्पादने वापरत असतात.
त्यासोबत काही लोक लिंबाचा रस देखील चेहऱ्यावर आणि केसांसाठी वापरत असतात.
ज्यामध्ये काही लोक चेहऱ्यावर लिंबाचा रस लावतात तर काही लोक त्यामध्ये नैसर्गिक वस्तू मिसळून ते चेहऱ्यावर लावतात.
लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते. ते तुमच्या त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करते. पण यामुळे तुमच्या चेहऱ्याला हानी देखील होऊ शकते.
हेल्थलाईनच्या मते, लिंबू नैसर्गिकरीत्या आम्लयुक्त आहे. त्यामुळे त्वचेवर कोरडेपणा, लालसरपणा अशा इतर देखील समस्या उद्भवू शकतात.
त्यामुळे जर तुमच्या चेहऱ्यावर आधीच मुरुम, कोरडेपणा अशा समस्या असतील तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या.