2 गुलाबजामधून पोटात गेलेल्या कॅलरीज बर्न करण्यासाठी किती वेळ चालावं लागेल?

एका गुलाबजाममध्ये प्रमाण किती?

एका गुलाबजाममध्ये 150 ते 200 कॅलरी असतात असं सांगितलं जातं.

किती कॅलरी शरीरात जातात?

म्हणजेच दोन गुलाबजाम खाल्ल्यास 300 ते 400 कॅलरी शरीरात जातात.

किती काळ व्यायाम?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या कॅलरी पोटात गेल्यानंतर किती काळ व्यायाम केल्यास अथवा चालल्यास या कॅलरी बर्न होतील?

किती वेळ धावावं लागेल?

हाच हिशोब धावण्याबद्दल लावला तर 300 ते 400 कॅलरी बर्न करण्यासाठी किमान अर्धा तास धावावं लागेल. म्हणजेच दोन गुलाब = अर्धा तास धावणे.

किती वेळ सायकल चालवावी लागेल?

सायकलचाही साधारण असाच हिशोब आहे. अर्धा तास सायकल चालवल्यास 250 ते 300 कॅलरी बर्न होतात. म्हणजेच दोन गुलाबजामसाठी किमान पाऊण तास सायकलिंग फिक्स आहे.

किती वेळ डान्स करावा लागेल?

डान्स करताना 30 मिनिटामध्ये 200 ते 300 कॅलरी बर्न होतात. म्हणजेच गुलाबजाम खाल्ल्यावर किमान अर्धा पाऊण तास नाचल्यास पोटात गेलेल्या सर्व कॅलरी खर्च होतील.

अर्धा तास चाललं तर...

तर आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार अर्धा तास चालल्यास 200 ते 300 कॅलरी खर्च होतात.

दोन गुलाबजाम खाल्ल्यानंतर किमान किती वेळ चालावं लागेल?

म्हणजेच दोन गुलाबजाम खाल्ल्यावर किमान एक तास तरी चालवं लागेल. तरच या गुलाबजामच्या माध्यमातून पोटात गेलेल्या कॅलरी बर्न होतील.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story