आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या दिशेनं अनेक भाविकांचे पाय वळू लागले आहेत. विठ्ठलभेचीच आस अनेकांच्या मनात आहे.
इथं वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचत असतानाच तिथं प्रशासनही त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या वारीतील भाविकांच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने तब्बल 64 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या रेल्वेंमुळं भाविकांचा प्रवास अधिक सुकर होणार यात शंकाच नाही. 7 जूलैपासून या विशेष फेऱ्यांचं आरक्षण सुरू होणार आहे.
सदर रेल्वे फेऱ्यांच्या सविस्तर माहितीसाठी मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधला असता तिथं शंकानिरसन होणार आहे.
रेल्वे फेऱ्यांचं नियोजन पुढीलप्रमाणे... मिरज- कुडूवाडी मार्गावर 20 विशेष फेऱ्या, नागपूर-मिरज-नागपूर 4 विशेष फेऱ्या, नवी अमरावती-पंढरपूर 4 विशेष फेऱ्या, खामगाव-पंढरपूर 4 विशेष फेऱ्या, लातूर- पंढरपूर 10 विशेष फेऱ्या, भुसावळ-पंढरपूर 2 विशेष फेऱ्या, मिरज-पंढरपूर 20 विशेष फेऱ्या.