धकाधकीच्या जीवनात पुरेशी झोप घेणं फार महत्वाचं असतं. अपुऱ्या झोपेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार ० ते ३ महिन्यांच्या बाळांसाठी १४ ते १७ तास झोप आवश्यक असते.
४ ते १२ महिन्यांच्या बाळांसाठी १२ ते १६ तासांची झोप आवश्यक असते.
१ ते २ वर्षांच्या लहान मुलांनी ११ ते १४ तासांची झोप घ्यायला हवी.
३ ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना १० ते १३ तासांची झोप आवश्यक असते.
९ ते १२ वर्षांच्या लहान मुलांनी ९ ते १२ तासांची झोप घ्यायला हवी.
१३ ते १८ वर्षांच्या मुलांनी ८ ते १० तास झोप घ्यायला हवी.
१८ ते ६० या वयोगटातील माणसांनी दररोज ७ तास झोप घेतली पाहिजे.
६० ते ६५ वयाच्या लोकांनी ७ ते ९ तासांची झोप घ्यावी.
६५ किंवा त्याहून अधिक वय असलेल्या लोकांनी ७ ते ८ तासांची झोप घ्यावी.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)