जीवनात कधी न कधी सर्वांनाच रेल्वेनं प्रवास करण्याची संधी मिळते. भारतातील जवळपास 80 टक्के लोकसंख्या रेल्वेनं प्रवास करते.
अशा या रेल्वे प्रवासादरम्यान तुम्ही कधी पाहिलंय का, की लांब पल्ल्याच्या गाड्यांना सुरुवातीला आणि शेवटीच जनरल बोगी अर्थात सामान्य कक्ष असतो.
जनरल डब्यामध्ये असणारी प्रवासी संख्या पाहता रेल्वे जेव्हा स्थानकावर थांबते तेव्हा गर्दी विभागली जाते आणि त्यामुळं फलाटावर अडचणी कमी होतात.
ही बोगी मध्ये असल्यास प्रचंड गर्दीमुळं अनेक आव्हानं निर्माण होण्याची शक्यता असते.
थोडक्यात कोणत्याही अडीअडचणीच्या वेळी संकटं आणखी वाढू नयेत आणि गर्दीमुळं इतर प्रवाशांनाही त्रास होऊ नये म्हणूनही डबे सुरुवातीला आणि शेवटाला असतात.
रेल्वेकडून आपात्कालिन परिस्थितीचा विचार करत हे डबे ट्रेनच्या दोन टोकांवर जोडलेले असतात.