रात्री डाव्या कुशीवर का झोपावं?


चांगली झोप ही माणसाच्या निरोगी आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची असते.


रात्री झोप पूर्ण झाली की सकाळी फ्रेश वाटतं आणि काम करण्यासाठी उत्साह येतो.


तज्ज्ञ नेहमी उजव्या कुशीपेक्षा डाव्या कुशीवर झोपण्याचा असा सल्ला देतात. मात्र यामुळे नेमके कोणते फायदे होतात याविषयी जाणून घेऊयात.


तज्ज्ञांच्या मते डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. हृदयावर दाब जाणवत नाही.


डाव्या कुशीवर झोपल्याने शरीराच्या इतर भागांसह मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो.


गरोदर स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे फायद्याचे ठरते. यामुळे टाच, हात, पाय इत्यादींना आलेली सूज कमी होते तसेच बाळावर सुद्धा विपरीत परिणाम होत नाही.


डाव्या कुशीवर झोपल्याने अ‍ॅसिडिटी आणि छातीत जळजळणे अश्या समस्या कमी होतात.


डाव्या कुशीवर झोपल्याने पचन क्रिया सुरळीत होते. परिणामी शरीरात जमा होत असलेले टॉक्सिन लसिका वाहिनी तंत्राद्वारे बाहेर पडतात.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story