गर्भधारणेत अडचणी येत असल्यास काही महत्त्वाच्या चाचण्या करून घेण्याचा सल्ला जोडप्यांना दिला जातो. गर्भधारणेत नेमक्या काय अडचणी येत आहेत याची माहिती या चाचण्यांमुळे मिळते.
ओव्यूलेशन टेस्ट- या चाचणीमध्ये तुमच्या अंडाशयातून नियमित स्वरुपात शुक्राणूंची निर्मिती होतेय का याची तपासणी केली जाते.
एचएसजी- ही एक्स रे टेस्ट तुमचं गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब यांची तपासणी करण्यासाठी मदतीची ठरते.
अल्ट्रासाऊंड- या चाचणीमध्ये प्रजननक्षम अवयवांची संरचना लक्षात येते.
हार्मोन टेस्ट- या चाचणीमध्ये शरीरातील हार्मोनचा स्तर लक्षात येतो.
वरील चाचण्यांच्या आधारे डॉक्टर गर्भधारणेत अडचणी येणाऱ्या जोडप्यांना पुढील उपचारांसंबंधी सल्ले देतात.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, आरोग्यविषयक सल्ल्यांसाठी तज्ज्ञ आणि डॉक्टरांची मतं विचारात घ्या.)