पावसाळ्यात अळूची भाजी खाण्याचे फायदे

Sep 14,2024


पावसाळ्याच्या दिवसात भाजी मंडईमध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी येतात त्यापैकीच एक म्हणजे 'अळू'.


पावसाळ्यात अळूची भाजी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात तसेच 6 आजार बरे होण्यासाठी सुद्धा मदत होते.


अळूमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते. याशिवाय अळूमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6, फोलेट तसेच मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज या सारखे पोषक गुणांनी असतात.


अळूच्या भाजीचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात येऊ शकते.


अळूमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते ज्याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते.


अळूच्या पानांमध्ये फायबर असलयाने याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळून वजन कमी करण्यास मदत होते.


अळूच्या पानांमध्ये बीटा कॅरोटीन असते ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी ही तीक्ष्ण होते.


अळूच्या पानांचे सेवन केल्याने हाडं मजबूत होतात.


अळूच्या पानांमध्ये पोषकतत्व असतात ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story