काळी मिरी आणि लवंगमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुण भरभरून असतात.
काळी मिरी आणि लवंगचे नियमित सेवन केल्यानं पचनसंस्था बिघडणं ,बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस यांसारख्या पोटाच्या समस्यांपासून त्वरित आराम मिळतो.
मधुमेहाच्या आजारात रोज काळी मिरी आणि लवंगचं सेवन केल्यानं साखरेवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.
काळी मिरी आणि लवंग खाल्ल्यानं शरीरात सूज येण्याची समस्याही आटोक्यात येते.
काळी मिरी आणि लवंग खाल्ल्यानं वजन नियंत्रित राहतं शिवाय पोटाभोवतीची चरबी कमी होण्यास मदत होते.
निरोगी हृदयासाठी रक्तदाब सामान्य असणं खूप महत्वाचं आहे. काळी मिरी आणि लवंग शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्था सुधारतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)