लवंगामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड, फोलेट, अँटी बॅक्टेरियल, व्हिटॅमिन सी तसेच अँटी ऑक्सिडंट्स असे गुणधर्म असतात.
आहारात लवंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात ज्यामुळे काही आजारी दूर पळतात.
5 लवंग रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी लवंग काढून हे पाणी तुम्ही पिऊ शकता.
दररोज 10 दिवस लवंगाचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि पचनाशी निगडित अनेक आजार दूर होतात.
सकाळी लवंगाचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल तर अशावेळी लवंगाचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास लवंगाचे पाणी उपयुक्त ठरते.
तोंडाची योग्य स्वच्छता न राखल्याने दात दुखीची समस्या जाणवते. तेव्हा लवंगाचे पाणी प्यायल्याने दात दुखीपासून आराम मिळतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)