यंग जनरेशनमध्ये चहापेक्षा काँफी पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
झोप उडवण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदे असतात.
पण जगातील महागडी काँफी एका प्राण्याच्या पॉटीपासून बनते.
याचे नाव कोपी लुवाक असे आहे.
इंडोनेशियाची एक खास मांजर (लुवाक) च्या विष्ठेपासून बनते. याची चव चॉकलेटी असते.
या बिया धुवून सुकवल्या जातात आणि त्यापासून काँफी बनवली जाते.
भारतात ही काँफी प्रसिद्ध आहे. याची ऑनलाइन किंमत 8500 रुपये किलो आहे. तर देश-विदेशात याची किंमत 25 हजार प्रति किलो इतकी आहे.
कोपी लुकावप्रमाणे जाकू बर्ड काँफीदेखील जगातील महागडी काँफी आहे.
ही काँफी ब्राझिलची खास चिमणी (जाकू) च्या विष्ठेपासून बनवतात. ही चिमणी काँफी चेरी म्हणजेच काँफीचे फळ खाते.
यानंतर बिया आपल्या विष्ठेतून बाहेर काढते.याची चव फ्रूटी आणि गोड असते.
जाकू बर्ड काँफी कोपी लुवाकपेक्षा महाग म्हणजे 80 हजार रुपये प्रति किलोने मिळते.