देवीच्या नावांवरुन मुलींना द्या खास नावे

कायम राहिल मातेचा आशिर्वाद

भारतीय परंपरेत मुलाला नाव ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. हिंदू संस्कृतीत 16 संस्कारांपैकी एक नामकरण या संस्काराचा समावेश करण्यात आला आहे. आज मुलींसाठी हिंदू देवींच्या नावांवरुन निवडा खास नावे .

राधा

भगवान श्रीकृष्णासोबत राधेचं नाव जोडलं जातं. मुलीसाठी हे दोन अक्षरी नाव अतिशय खास आहे.

आद्या

'आद्या' या नावाचा अर्थ आहे आदि शक्ती. यामुळे तुमची लाडकी कायमच अव्वल स्थानी असेल.

अभया

'अभया' या नावाचा अर्थ आहे निडर,साहसी. या नावामुळे तुमच्या मुलीच्या जीवनातून भीती कायमची दूर होईल.

इंद्रजा

देवतांचे राजा इंद्र यांच्या मुलीचे नाव 'इंद्रजा' होते. या नावामुळे तुमची मुलगी कायम राहील वैभवशाली.

उमा

आदि शक्तीचे नाव आहे 'उमा'. यामुळेच आपल्या मुलीला द्या उमा हे नाव.

जया

'जया' या नावाचा अर्थ आहे जी कायमच विजयी असते. या नावामुळे लेकीला पराजय म्हणजे काय हे कळणारच नाही.

सिद्धी

परमपूज्य भगवान गणेशाच्या पत्नीचे नाव 'सिद्धी' आहे. यामुळे मुलीकरता हे नाव निवडू शकता.

श्री

माता लक्ष्मीची छोटे नाव म्हणजे 'श्री'. मुलीसाठी निवडा हे नाव ज्यामध्ये आहे धन, धान्य आणि संपत्ती

VIEW ALL

Read Next Story