तेल मालिशमुळं बाळाच्या मांसपेशी आणि हाडांना बळकटी मिळते. त्यांचा शारीरिक विकास वेगानं होतो.
लहान बाळाला तेल मालिश करणं महत्त्वाचं असलं तरीही दिवसातून नेमकी किती वेळा मालिश केली जाते हेसुद्धा महत्त्वाचं.
दर दिवशी एकदा किंवा दोन वेळा किमान 10 ते 15 मिनिटं तेल मालिश केल्यास बाळाला त्यामुळं फायदा होतो.
तेल मालिश केल्यामुळं बाळाच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत चालते.
तेल मालिशमुळं बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास वेगानं होतो.
तेल मालिशमुळं बाळाची झोप चांगली होते. तज्ज्ञांच्या मते बाळाला स्तनपान केल्यानंतर साधारण 45 मिनिटांनी मालिश करावी.