जवळपास प्रत्येक घरांमध्ये जेवण बनवण्यासाठी कुकरचा वापर केला जातो.
परंतु कुकरचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी अन्यथा दुर्घटना होऊ शकते.
जेवण शिजवताना कुकर पूर्णपणे भरू नका, तसेच त्यात पाण्याचे प्रमाण देखील मर्यादितच ठेवा.
कुकर जास्त भरल्याने त्यावरील दाब वाढतो आणि कुकर फुटण्याची भीती असते.
कुकरची रिंग खराब झाली असेल तर ती बदला कारण खराब रबर कुकरमध्ये चांगलं प्रेशर बनवू शकत नाही.
कुकरच्या शिटीमध्ये अन्नाचे कण अडकले असतील तर शिटी पाण्याने नीट स्वच्छ करा.
कुकरमध्ये पाण्याचे प्रमाण अतिशय कमी असू नये. पाणी कमी असल्याने वाफ जास्त बनते ज्यामुळे कुकर फुटण्याची शक्यता असते.