वर्क फ्रॉम होम करत असाल तर 'या' सवयी आत्ताच टाळा

कोरोनाच्या काळात अनेकांनी घरून काम करायला सुरुवात केली. पण काही चुकांमुळे कामावरही परिणाम होऊ शकतो.

जर लक्ष विचलित होत असेल तर एका शांत ठिकाणी बसून काम करा किंवा कुटुंबातील सदस्यांना तुमच्या कामाच्या तासांबद्दल सांगू शकता जेणेकरून ते तुम्हाला त्रास देणार नाही.

स्वतःसाठी वैयक्तिक वेळ काढा, कामात मिसळू जाऊ नका. तुमचे काम झाल्यानंतर, तुमचा वैयक्तिक वेळ चांगला घालवा, कारण तुमचे काम आणि वैयक्तिक वेळेत फरक राखणे महत्त्वाचे आहे.

जर तुम्ही झोपून किंवा पलंगावर बसून काम करत असाल तर तसे करणे टाळा. यामुळे तुमचे काम तर कमी होईलच पण झोपेवरही परिणाम होईल.

सतत काम करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. एखादा लहान ब्रेक घेत राहिलं पाहिजे.

एकावेळी एकच काम करा, असे केल्याने तुम्ही तुमचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. एकाच वेळी अनेक गोष्टी केल्याने चुका वाढतात.

तुमचे काम वेळेवर पूर्ण करा आणि पुढे ढकलणे टाळा. त्यामुळे कामाचा ताण कमी होईल.

VIEW ALL

Read Next Story