थंडीमध्ये टाचांना भेगा पडण्याची समस्या खूप सामान्य आहे. ज्याकडे लक्ष न दिल्यास ते गंभीर ही होऊ शकतं.
काहीवेळा ही समस्या इतकी गंभीर होते की तीव्र वेदनांसोबत टाचातून रक्त ही निघायला सुरू होतो.
अशा वातवरणामध्ये आपण अगोदरच सतर्क राहण्याची गरज असते आणि त्यासाठी स्वयंपाकघरातच उपलब्ध घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवु शकता.
अर्धी बादली कोमट पाण्यात लिंबाचा रस, एक चमचा गुलाबजल मिसळा. आता त्यात तुमचे पाय 15-20 मिनिटे भिजवा. यामुळे काही दिवसात टाचा मऊ होतील.
एका बादली पाण्यात एक कप मध मिसळा आणि त्यात आपले पाय 15-20 मिनिटे भिजवा. नंतर टाच घासून घ्या. तुम्ही स्क्रब केल्यानंतर, कोमट पाण्याने पाय धुवा. तुम्ही हे जोपर्यंत तुम्हाला फरक दिसत नाही तोपर्यंत हे दररोज करू शकता.
खोबरेल तेलाने भेगा पडलेल्या टाचांची मालिश करा आणि त्यानंतर मोजे घाला. रात्रभर पायांना तेल ठेवा. तर हा टाच फुटणे टाळण्यासाठी सर्वात स्वस्त, सोपा आणि प्रभावी उपचार आहे.
आपल्या टाचा कोमट पाण्यात 5-10 मिनिटे भिजवा. आता त्यावर कोरफड लावा आणि मोजे घालून ठेवा आणि यामुळे काही दिवसात टाच मऊ होऊ लागतील.
जर तुम्ही हे उपाय तुमच्या घरी केले तर तुम्हाला लवकरच फरक दिसू लागेल.