आयुर्वेदात आवळा वरदान मानलं जातं. आवळा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानला जातो.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, पॉलिफेनॉल, लोह, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि जस्त यांसारखे पोषक घटक आढळतात.
हे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, तसंच त्वचा, डोळे आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं.
जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्याने यकृतातील एन्झाईम्सची पातळी वाढू शकते, जे यकृताच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे. तुम्ही यकृताची समस्या असल्याने आवळा खाऊ नये.
ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी आवळ्याचे सेवन केल्यास रक्तदाब कमी होतो. अशा परिस्थितीत रुग्णाची समस्या वाढू शकते.
ज्या लोकांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असतं त्यांनी आवळा जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक ठरतं.
ज्या लोकांना किडनीशी संबंधित कोणतीही समस्या आहे. आवळ्याच्या अतिसेवनाने शरीरातील सोडियमची पातळी वाढते, तसंच किडनीच्या कार्यावरही परिणाम होतो.
जर तुम्हाला सर्दी आणि फ्लूची समस्या असेल तर तुम्ही या दरम्यान आवळा खाणे टाळावे.
जर तुम्हाला त्वचा आणि टाळूच्या कोरडेपणाची समस्या असेल तर आवळ्याचे जास्त सेवन केल्याने ही समस्या वाढू शकते.
जे लोक कोणत्याही प्रकारच्या आजारासाठी शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यांनी ऑपरेशनच्या 2 आठवड्यांपूर्वी आवळ्याचे सेवन पूर्णपणे बंद करावे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)