आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
ज्यामध्ये त्यांनी कोणत्या ठिकाणी मौन बाळगणे महत्त्वाचे हे सांगितले आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, अज्ञानी व्यक्तीशी वाद घालण्यात आपली शक्ती वाया जाते. त्यामुळे त्या ठिकाणी बोलणे टाळावे.
योग्य वेळी योग्य ते बोलणे अधिक परिणामकारक असते. त्यामुळे कधी कधी शांत राहणे हाच योग्य निर्णय असतो.
त्याचप्रमाणे ज्यांना सत्य ऐकायचे नाही त्यांना समजावून सांगण्यात काही अर्थ नाही.
चाणक्य यांच्या मते, रागाच्या भरात शांत राहून शब्दांवर नियंत्रण ठेवणे कधीही योग्य आहे.