'या'9 देशांमध्ये Kiss करणं गुन्हा! पकडले गेलात तर थेट जेल...

Kiss Day साजरा करत असताना 'या'देशांमध्ये मात्र बंदी

दुबई

हे शहर खूप विकसित वाटत असले तरीही येथे किस करणे चुकीचे समजले जाते. सार्वजनिक ठिकाणी किस केल्यास शिक्षा होऊ शकते. किंवा मोठी रक्कम भरावी लागू शकते.

चीन

टेक्नॉलॉजीमध्ये विकसित असलेल्या या देशात सार्वजनि ठिकाणी आजही किस करण्याला विरोध आहे. हा एक अपराध समजला जातो.

झिम्बाब्वे

ग्लोबल सिटीझन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, झिम्बाब्वे विद्यापीठाचे विद्यार्थी कॉलेजमध्ये चुंबन घेताना दिसले तर त्यांना तात्काळ कॉलेजमधून बाहेर काढले जाते.

वियतनाम

वियतनाम टूरिस्ट डेस्टिनेशन असूनही येथे किस करण्यास मनाई आहे. ग्रामीण व्हिएतनाममध्ये, हनोई आणि सायगॉनसारख्या शहरांमध्ये, लोकांना खुलेआम चुंबन घेतल्याबद्दल शिक्षा होऊ शकते.

कॅथोलिक मास

कॅथोलिक मासमध्ये, चर्चमध्ये जाणाऱ्यांना साइन ऑफ पीस देण्यास सांगितले जाते. प्राचीन काळापासून, या चिन्हाचा अर्थ कुटुंबांमधील हस्तांदोलन किंवा किस करणे असा आहे. पण आता फक्त हस्तांदोलन करण्यास सांगितले आहे.

कतार

कतारमध्ये जर तुम्ही रात्री हात धरलेले दिसले तर कोणाचा फारसा आक्षेप नाही, पण चुंबन विसरून जा.

भारत

भारतीय दंड संहितेच्या कलम 294 अन्वये जो कोणी सार्वजनिक ठिकाणी किस करताना किंवा कोणतेही चुकीचे कृत्य करतो त्याला तीन महिने तुरुंगवास किंवा दंड भरावा लागतो.

इंडोनेशिया

इंडोनेशियामध्ये बालीसह अनेक ठिकाणे आहेत जिथे लोक हनिमूनसाठी येतात. पण जर तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी बीचवर उपस्थित असाल तर चुकूनही तुमच्या पार्टनरला किस करू नका कारण इथे तो गुन्हा मानला जातो.

थायलंड

थायलंडमध्ये आजही असे अनेक क्षेत्र आहेत जिथे किस करणे हा गुन्हा आहे आणि पाहिल्यास प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story