फक्त चिकन - मटणच नाही, 5 भाज्यातूनही मिळत Vitamin-B12

Pooja Pawar
Nov 21,2024


Vitamin-B12 हे पोषकतत्व मानवी शरीरासाठी अत्यंत महत्वाचं ठरतं.


शरीरात Vitamin-B12 ची कमतरता झाल्यास आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात.


साधारणपणे अंड, कलेजी इत्यादी Vitamin-B12 चे महत्वाचे स्रोत असतात. परंतु काही भाज्या सुद्धा आहेत ज्यात Vitamin-B12 चं चांगलं प्रमाण आढळतं. त्यांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.

Vitamin-B12 ची कमतरतेची लक्षण :

Vitamin-B12 ची कमतरता जाणवल्यास थकवा, श्वास घ्यायला त्रास होणे, चक्कर येणे, भूक न लागणे, जीभ लाल होणे, चिडचिड होणे इत्यादी लक्षण दिसू लागतात.

मशरूम :

मशरूममध्ये Vitamin-B12 चं चांगलं प्रमाण आढळतं. याचा तुम्ही डायटमध्ये विविध प्रकारे समावेश करू शकता.

पालक :

पालक सुद्धा Vitamin-B12 चा चांगला स्रोत आहे. तुम्ही पालकचा सॅलेड, स्मूदी किंवा भाजी बनवून समावेश करू शकता.

बीट :

बीटमध्ये Vitamin-B12 आढळते. तुम्ही बीटचं सूप, सॅलेड, ज्यूस इत्यादीचा बनवून त्याचा आहारात समावेश करू शकता.

बटरनट स्क्वॅश :

बटरनट स्क्वॅश ही एक पौष्टिक आणि स्वादिष्ट भाजी असून Vitamin-B12 चा चांगला स्रोत आहे.

बटाटा :

बटाट्यामध्ये Vitamin-B12 चं चांगलं प्रमाण आढळतं.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story