भारतामध्ये टीव्हीवर सर्वात प्रथम दूरदर्शन हा चॅनल आला होता.
ज्याची सुरुवात 15 सप्टेंबर 1959 मध्ये झाली होती. त्यावेळी टेलिव्हिजन इंडिया असे नाव होते.
त्यानंतर 1975 मध्ये याचे नाव बदलून दूरदर्शन ठेवण्यात आले.
1965 पासून दूरदर्शनचे दैनिक प्रसारण सुरु झाले.
या चॅनलवर कृषी दर्शन, रामायण आणि महाभारत दाखवले जात होते.
सुरुवातीला हे आठवड्यातून फक्त तीन दिवस अर्धा तास प्रसारित केले जात असे.
मात्र, आता ते 24 तास सुरु आहे. दूरदर्शनकडे अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाहिन्या आहेत.