रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमळ नात्याचं प्रतिक असलेला सण जगात सगळीकडेच थाटामाटात साजरा केला जातो. तर या वर्षी रक्षाबंधन 19 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे.
आपल्याकडे रक्षाबंधनला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. भाऊ बहिणीच्या नात्याला समर्पित करणारा हा सण ज्यामध्ये भाऊ आपल्या बहिणीला सुरक्षिततेचे वचन तर देतोच पण त्यासोबत भेटवस्तू देणं ही देखील महत्त्वाची परंपरा आहे.
तुम्ही सुद्धा तुमच्या बहिणीला या भेटवस्तू देऊ शकता.
सोनं किंवा चांदीची वस्तू देणं अत्यंत महत्त्वाच्या भेटवस्तू मानल्या जातात. यामुळे संपत्ती आणि समृद्धी आकर्षित होते अशी मान्यता आहे. तर चांदीच्या वस्तू हे शांतता आणि शितलतेचे प्रतिक समजले जाते. अशा भेटवस्तू दिल्याने भावाला आर्थिक समृद्धी आणि मानसिक शांतता मिळते.
देव-देवतांच्या मूर्ती अशा धार्मिक वस्तू देखील दिल्या जाऊ शकतात. यामुळे भाऊ बहिणीचं नातं मजबूत होतं आणि भावाला जीवनात आनंद , समृद्धी आणि सकारात्मकतेसाठी प्रेरित करतं.
तुम्ही तुमच्या बहिणीला फॅशनेबल कपडे, घड्याळ किंवा तिच्या आवडीच्या वस्तू भेट देऊ शकता.
ज्ञान वाढवण्यासाठी पुस्तक भेट देणं ही नक्कीच एक चांगली भेटवस्तू आहे.