तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण फ्रान्समध्ये टोमॅटो केचअपवर बंदी घालण्यात आली आहे.
तरुण मुलांमध्ये टोमॅटो केचअप खाण्याचं प्रमाण अधिक असल्याचं लक्षात आल्याने फ्रेंच सरकारने यावर बंदी घातली आहे. मात्र ही बंदी केवळ स्कूल कॅन्टीनपुरती मर्यादीत आहे.
फ्रेंच खाद्यसंस्कृतीवर अमेरिकेचा प्रभाव पडू नये म्हणून टोमॅटो केचअपवर बंदी घालण्यात आल्याचं अनेकांचं माननं आहे.
भारतामध्ये प्रत्येक घरात तूप आढळून येतं. मात्र अमेरिकेतील फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने तुपावर बंदी घातली आहे.
जडत्व, हृदयविकार आणि रक्तदाबासारख्या समस्यांच्या धास्तीने तुपावर बंदी घालण्यात आली आहे.
च्युईंगमवर बंदी घातलेला एक देश आशियामध्ये. या देशाचं नाव आहे सिंगापूर.
सिंगापूरने 1992 साली च्युईंगमच्या निर्मितीवर आणि व्यापारावर बंदी घातली.
मात्र 2004 साली वैद्यकीय कारणासाठी वापरलं जाणारं च्युईंगम खाण्यास परवानगी देण्यात आली.
थंडीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी च्यवनप्राशनचं सेवन केलं जातं. मात्र कॅनडामध्ये 2005 सालापासून च्यवनप्राशवर बंदी घालण्यात आली आहे.
ब्रॅण्डेड च्यवनप्राशमध्ये मोठ्या प्रमाणात शीसे आणि पाऱ्याचा अंश आढळून आल्याने कॅनडाने ही बंदी घातली.
सोमालिया देशामध्ये 2011 पासून सामोश्यावर बंदी घालण्यात आली आहे.
समोश्याचा आकार त्रिकोणी असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. 'अल-शाबाब ग्रुप'च्या मान्यतेनुसार त्रिकोण हा ख्रिश्चन धर्माचं चिन्हं आहे. म्हणून त्याच्या सेवनावर बंदी आहे
सोमालियामध्ये समोसा खाणाऱ्याला कठोर शिक्षा होऊ शकते.