श्रेयांश कदम, नाशिक

या चिमुकल्याकडे यंदा दोन बाप्पा विराजमान होते. मोठ्या भक्तीभावाने त्यांनी बाप्पाला निरोप दिला.

मुकुंद पेंढारकर नाशिक

गोंडस बालगणेशा झुल्यावर विराजमान आहे. अगदी सुंदर आणि साधी सजावट मन मोहीत करते.

शांतदीप मेटल्स प्राईवेट लिमिटेड, वालूज, संभाजीनगर

शलाका संजोत प्रदीप चौधरी यांच्या कंपनीत बाप्पाची मनोभावे पूजा करण्यात आली.

रेवती साखरे, संभाजीनगर

फुलांच्या सजावटीमध्ये अगदी ऐटीत बाप्पा विराजमान आहे.

पौर्णिमा परांजपे, छत्रपती संभाजी नगर

यांचा बाप्पा जणू काही निसर्गाच्या सान्निध्यात रमला आहे. बाप्पाच्या चरणी आवडते मोदक अर्पण करण्यात आलेय.

सलोनी वैशाली प्रवीण डोखोळे, बर्मिंगहॅम, यूके

या विद्यार्थींनी परदेशातही आपली परंपरा जपली आहे. तिने बाप्पाची मनोभावे पूजा केली आहे.

शालवक शिल्पा संदीप विरखरे, नागपूर

अगदी छोटी, सुंदर नक्षीकाम, लोभस डोळे असणाऱ्या या बाप्पाच्या मूर्तीने घरातील वातावरण आनंदी झालं होतं.

अश्वत अर्पणा सौरभ खडसे, शिरपूर, धुळे

फुलांची आरास आणि त्यात निरागस बाप्पाची मूर्ती मनमोहून टाकतं.

साक्षी शैलेश कोकीळ, ॲड. शिवाई नगर, ठाणे पश्चिम

विठ्ठलाची सुरेख आरास आणि त्यात गणपती बाप्पा...अतिशय सुंदर अशी सजावट यांनी केलीय.

सोहम वैशाली प्रवीण डोखोळे, नागपूर

मूषकराजवर विराजमान हा बाप्पा मन प्रसन्न करतो.

अनुस्मित आणि अनुश्रुत उर्वशी शार्दुल चौधरी, नागपूर

बाप्पा घरी आल्या म्हणून या चिमकुल्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

ओजस झगडे, ठाणे

रुप तुझे गोजिरवाणी, गणेशाची सुरेख मूर्ती मन प्रसन्न करते.

अश्विनी अभय वाळुंज, नेरुळ, नवी मुंबई

यांनी केदारनाथ मंदीराचा देखावा साकारला आहे.

VIEW ALL

Read Next Story