तूमच्या घरचा बाप्पा झी 24 तासवर

दर्शन घ्या बाप्पांच झी 24 तास बरोबर. सगळ्याच घरांमधून सध्या बाप्पाचा गजर सुरू आहे. चला तर दर्शन घेऊया घरगुती बाप्पांचे.

मुकुंद पेंढारकर, नाशिक

पेंढारकर कुटुंबीयानी सुंदर आकर्षक व निसर्गरम्य अशी सजावट करून झाडाखालील झोपाळ्यामधे गणपती बाप्पांना विराजमान केले आहे.

पराग भानुदास अत्तरदे , जळगाव

यांनी शाडूच्या मातीची सुंदरशी मूर्ती बनवून स्थापना केली. देखावा निसर्गस्नेही साहित्याचा बनवला आहे

मोहित विनोद बाणखेले , पुणे

यानी 292 पत्रावळी, 242 द्रोण आणि पर्यावरणपुरक वस्तू वापरून सजावट केली आहे.

श्रुती हांडे

कार्डबोर्ड बॉक्स आणि मॅचस्टिक बॉक्सचा वापर करून सजावट केली आहे.

श्रीकृष्ण राखुंदे , करमाळा

यानी सजावटीसाठी छान कागदी पेले वापरले आहेत.

श्रेयस भुरे , नागभीड

यांनी फारच सुंदर देखावा उभारला आहे . चारा वापरून छत बनवले आहे.

निलेश हांचाळे , नवी मुंबई

यांनी फळांची आरास बाप्पासाठी केली आहे.

राजू जाधव

जाधवांच्या बाप्पाची मुर्ती फारच रेखीव आहे.

श्रीकृष्ण सदाशिव लोणकर

यांनी आरासीत विठूमाऊलीचा देखावा उभारला आहे.

दिशा शिंदे , ठाणे

शिंद्यांनी आरासीत जेजुरी उभारली आहे.

सौरभ राऊत , वसई

यांनी फार साधी आणि आकर्षक अशी आरास केली आहे.

VIEW ALL

Read Next Story