या मिठीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकांनी दोघांचही कौतुक केलं आहे.
मिठी मारल्याचा हा क्षण आयपीएलमधील विजयाच्या सर्वात खास क्षणांपैकी एक ठरला.
जडेजाने त्याच्या पत्नीबरोबरच मुलीसहीत हातात आयपीएलची ट्रॉफी घेऊन फोटोही काढला.
जडेजाने जशाप्रकारे पत्नीला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली तशी कामगिरी आयुष्यात एकदा तरी करता आली पाहिजे अशा अर्थाचे फोटोही व्हायरल झालेत.
रिवाबा यांनी रविंद्र जडेजाला मारलेली मिठी ही अगदी कपल गोल्स असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
रिवाबा यांनी धोनीचंही अभिनंदन यावेळेस केलं.
पतीने मिळवलेलं यश पाहून रिवाबा यांना आनंदाश्रू अनावर झाले.
धोनीच्या सेलिब्रेशनदरम्यान जडेजाला उचलून घेण्याबरोबर जडेजाने पत्नीला मारलेल्या मिठीही सोशल मीडियावर तितकीच चर्चा होती.
विजय मिळवून देणाऱ्या जडेजाला धोनीनेही उचलून घेत आनंद साजरा केला.
जडेजा आणि त्याच्या पत्नीने मारलेल्या मिठीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
रिवाबा यांनी आपल्या पतीला म्हणजेच जडेजाला कडकडून मिठी मारली.
रविंद्र जडेजाने संघाला विजय मिळवून दिल्यानंतर रिवाबा यांनी मैदानात धाव घेतली आणि त्या सीएसकेच्या आनंदोत्सवात सहभागी झाल्या.
जडेजा निर्णायक क्षणी फलंदाजी करत असताना अनेकदा कॅमेरा रिवाबा यांचे हावभाव टिपताना दिसला.
रिवाबा या गुजरात विधानसभेतील आमदार आहेत. त्या त्यांच्या मुलीसहीत अंतिम सामना पाहण्यासाठी आली होती.
जडेजाने विजय मिळवल्यानंतर सेलिब्रेशन सुरु असतानाच अचानक स्क्रीनवर हिरव्या रंगाच्या साडीतील एका महिलेचं सेलिब्रेशन दाखवण्यात आलं. ही महिला होती जडेजाची पत्नी, रिवाबा जडेजा!
चेन्नईच्या या विजयाचा शिल्पकार ठरला रविंद्र जडेजा. शेवटच्या 2 चेंडूवर चौकार आणि षटकाराच्या मदतीने जडेजाने 10 धावा करत संघाला जेतेपद मिळून दिलं.
चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला पराभूत करत पाचव्यांदा IPL ची ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम IPL 2023 च्या अंतिम सामन्यात केला.
हा क्षण कॅमेरात कैद झाला असून या दोघांच्या मिठीचे फोटो व्हायरल झालेत.