तान्या पुरोहित

उत्तराखंडमधल्या एका लहान गावातून आलेल्या तान्या पुरोहितने आयपीएलमध्ये आपल्या अँकरिंगने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. तान्या पुरोहित युवा पिढीसाठी प्रेरणा आहे. गढवाल युनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण करणाऱ्या तान्याने हिंदी चित्रपटातही अभिनय साकारला आहे.

नेरोली मेडोज

ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स पत्रकार नेरोली मेडोजसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून स्पोर्ट्स शोचं अँकरिंग करतेय. नेरोली केवळ ऑस्ट्रेलियातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. नेरोली आपल्या अँकरिंगच्या कारकिर्दीची सुरुवात फुटबॉल आणि बास्केटबॉलने केली. पण 2021 मध्ये आयपीएलमध्ये तिला पहिलांदा अँकरिंगची संधी मिळाली. आता आयपीएलच्या सोळाव्या हंगामातही ती दिसणार आहे.

नसप्रीत कौर

भारतीय स्पोर्ट्स अँकरिंग जगतातील ओळखीचा चेहरा म्हणजे नसप्रीत कौर. 2020 च्या आयपीएल हंगामात नसप्रीत अँकरिंग करताना दिसली होती. दुबईत खेळलेल्या गेलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामात नसप्रीत कौरचे लूक्स आणि कामाची चांगलीच चर्चा झाली होती. नसप्रीतचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आहे, पण पुढे कामानिमित्ताने ती भारतात स्थायिक झाली.

संजना गणेशन

आंतरराष्टीय क्रिकेट सामन्यांबरोबर आयपीएलमध्ये अँकरिग करणारा आणखी एक परिचीत चेहरा म्हणजे संजना गणेशन. आयपीएलच्या गेल्या हंगामातही संजानने अँकरिंगची जबाबदारी पार पाजली होती. संजनाने महिला टी20 वर्ल्ड कप 2022 चं अँकरिंगही केलं होतं. संजना टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू जसप्रीत बुमराहची पत्नी आहे.

मयंती लँगर

भारतीय महिला स्पोर्ट्स अँकरबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे मयंती लँगरचं. गेल्या अनेक वर्षांपासून मयंती लँगर क्रिकेटच्या मैदानात अँकरिंग करताना दिसत आहे. मयंतीने आपल्या सौंदर्याने अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. मंयती लँगर ही बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांची सून आणि क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आहे.

खुमासदार कॉमेंट्री आणि सौंदर्य

आयपीएल म्हटलं की चौकार-षटकारांची बरसात ही आलीच. मैदानावरच्या या चुरशीचं खुमासदार वर्णन करत समालोचकही चाहत्यांची उत्सुकता वाढवत असतात. यंदा खुसदार कॉमेंट्रीला सौंदर्याचीही जोड मिळणार आहे. यंदा अनेक सुंदर महिला कॉमेंट्रेटर आयपीएलमध्ये दिसणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story