आयपीएलचा सोळावा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात आला.
हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स आणि महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपर किंग्समध्ये पहिला क्वालिफायर सामना खेळला गेला.
या क्लालिफायर सामन्यापासून BCCI ने नवं अभियान सुरु केलं आहे. ज्यामुळे चाहते बीसीसीला सलाम करतायत.
आयपीएलच्या क्वालिफायर सामन्यात डॉट बॉल ऐवजी झाडाचा इमोजी दाखवला जात आहे.
झाडाचा इमोजी पाहून सुरुवातील क्रिकेट फॅन्स बुचकळ्यात पडले होते. पण जेव्हा यामागचं कारण कळलं तेव्हा कौतुक केलं जातंय.
आयपीएलमधल्या क्वालिफाय सामन्यात गोलंदाजांनी टाकलेल्या प्रत्येक डॉटबॉलसाठी बीसीसीआयने पाचशे झाडं लावण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत केलं जात आहे. झाडं लावा, झाडं वाचवा ही मोहिम भविष्यात फायदेशीर ठरणार आहे.
टीव्ही स्क्रीनवर डॉटबॉलच्या जागी दाखवल्या जाणाऱ्या झाडांची इमोजी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून ट्रेंडमध्ये आहे.
क्वालिफायर सामने आणि अंतिम सामन्यातही हे अभियान सुरु राहाणार आहे.
आयपीएलचा अंतिम सामना 28 मे रोजा खेळवला जाणार आहे. अहमदाबदच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा भव्य सामना रंगणार आहे.