इथं यादव, उनाडकट, ठाकूरला Fitness नं साथ दिली नाही, तर मुकेश कुमारची संघात सरप्राईज एंट्री होईल. आयपीएल गाजवणारा मुकेश मैदानात चक्क मोहम्मग सिराजलाही आव्हान देताना दिसेल.
सध्या उमेश यादव आणि शार्दुल ठाकूरला आयपीएल 2023 मध्ये फारसं यश मिळालेलं नाही. त्यामुळं या पाच दिवसांच्या अटीतटीच्या सामन्यासाठी ते योग्य आहेत का, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे.
शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जयदेव उनाडकट हे खेळाडूसुद्धा मध्यम गती ते वेगवान गोलंदाजीसाठी मोलाचा हातभार लावताना दिसतील. पण, त्यातून संघात कोणाला स्थान मिळतं ते पाहणं महत्त्वाचं.
तर, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या रुपात संघातील गोलंदाजीची फळी संतुलित राखण्याचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकांचा प्रयत्न असेल.
प्लेइंग इलेव्हनमध्ये असणारा मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांपुढे आव्हानं उभी करताना दिसतील.
ओवल मैदानावरील खेळपट्टीला असणारा वेग पाहता इथं भारतीय संघातील वेगवान गोलंदाज महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.
भारतीय संघानं सलग दुसऱ्यांदा WTC Final मध्ये धडक मारली असून, ऑस्ट्रेलियाची मात्र ही पहिलीच वेळ असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्याच्या घडीला एकिकडे आयपीएलची धूम असली तरीही, भारतीय संघ मात्र WTC Final च्या तयारीला लागला आहे.
ओवल मैदानावरील खेळपट्टीला असणारा वेग पाहता इथं भारतीय संघातील वेगवान गोलंदाज महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.
WTC Final 2023 मध्ये भारतीय संघातील 'हा' सरप्राईज पॅकेज खेळाडू ऑस्ट्रेलियाला देणार दणका?