इस्त्रोचा महत्त्वाकांशी प्रोजेक्ट चांद्रयान-३ नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग केली होती. चांद्रयान ३ वरील प्रज्ञान रोवरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन शोध लावला आहे.
कर्नाटकात भारतीय जनता पार्टी (BJP) 38 वर्षांची परंपरा खंडित करण्यात अपयशी ठरली. दक्षिणेतील कर्नाटक (Karnataka) हे एकमेव राज्य आहे जिथे भाजपचे सरकार होतं. त्याला काँग्रेसने छेद दिलाय.
इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे यंदाचं वर्ष चर्चेत राहिलं आहे. गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या या युद्धाचा अंत आता जवळ आल्याचं चित्र आहे.
प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं 9 मार्चच्या पहाटे निधन झालं होतं. त्यामुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली होती
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर केला.
तुर्कीत 5 ते 7 फेब्रुवारीदरम्यान म्हणजे जवळपास 48 तासात भूकंपाचे 39 हून अधिक धक्के बसले होते. त्यात तब्बल 20 हजार लोकांचा जीव गेला होता.
एप्रिल महिन्यात युपीचा गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्याता आली होती.
फ्रेंड्स या अमेरिकन टीव्ही सीरिजमध्ये चँडलर बिंग हे पात्र साकारुन प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या मॅथ्यू पेरीने वयाच्या 54 व्या वर्षी संशयास्पद मृत्यू झाला होता.
मणिपूर या ईशान्येकडच्या राज्यात तब्बल 4 महिने हिंसाचार पेटला होता. त्याचे धक्कादायक व्हिडीओ देखील समोर आले होते.
ओडिशामध्ये झालेल्या 3 रेल्वेच्या अपघाताने सगळ्यांनाच सुन्न केलं होतं. या भीषण अपघाताने तब्बल 275 हून अधिक लोकांचा जीव घेतला.