मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं शिक्षण किती? विश्वास नाही बसणार

मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांची निवड करण्यात आली आहे.

मोहन यादव हे विद्यमान सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री होते आणि ते उज्जैन दक्षिण मतदारसंघातून निवडून आले होते.

भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.

58 वर्षांचे मोहन यादव हे उज्जैन जिल्ह्यातील 3 वेळा आमदार राहिले आहेत.

यादव यांची नियुक्ती माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजकीय वाटचालीचा (किमान राज्यात) अंत मानली जाते.

मोहन यादव यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी संघटनेचे सचिव म्हणून सुरू झाला. यानंतर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले आणि नंतर अभाविपचे राज्यमंत्रीही झाले.

त्यानंतर 2013 मध्ये मोहन यादव पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर, 2018 च्या मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले.

2 जुलै 2020 रोजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यावर राज्याच्या राजकीय दृश्यात यादव यांचा प्रभाव अधिक दृढ झाला.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बीएससी, एलएलबी, एमए (पॉलिटीकल सायन्स), एमबीए, पीएचडी इतके शिक्षण पूर्ण केले आहे.

VIEW ALL

Read Next Story