या विहीरीत प्रतिबिंब दिसलं नाही तर....! देशातील या रहस्यमयी विहिरीबद्दल माहितीये का?

Jul 15,2023


यूपीच्या बनारसमधील मणिकर्णिका घाट आणि काशी विश्वनाथ बाबाच्या मंदिराशिवाय हिंदू धर्माची अनेक रहस्ये दडलेली आहेत.


याठिकाणी एक मंदिर आहे, ज्यामध्ये एक रहस्यमय विहीर आहे. ही विहीर भक्तांना त्याच्या मृत्यूचा संकेत देते, असा दावा केला जातो.


मीरघाटाच्या माथ्यावर धर्मेश्वर महादेव मंदिर असून याठिकाणी एक धर्मकुप देखील आहे.


रिपोर्ट्सनुसार, मंदिराच्या पुजाऱ्याचे म्हणणं आहे की, या विहिरीचा इतिहास गंगा पृथ्वीवर येण्यापूर्वीचा आहे. हे यमाने बांधलं होतं.


या गूढ विहिरीबद्दल अशी धारणा आहे की, ही विहीर मृत्यू दर्शवते.


या विहिरीत एखाद्या व्यक्तीची सावली दिसली नाही तर पुढील 6 महिन्यांत त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, असं म्हटलं जातं.


धर्मराज यमाने याठिकाणी गंगा उतरण्यापूर्वी तपश्चर्या केली होती, असं मानलं जातंय.


धर्मराज यमाने याठिकाणी गंगा उतरण्यापूर्वी तपश्चर्या केली होती, असं मानलं जातंय. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story