आधार कार्डवरील जुना फोटो कसा बदलायचा? फॉलो करा 'या' खूपच सोप्या स्टेप

भारतात, आधार कार्ड हे तुमची ओळख सांगण्यासाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. सरकारी काम असो वा खासगी तुम्हाला सर्वत्र आधार कार्डची सर्वत्र गरज असते.

सरकारी सुविधांचा लाभ

आधार कार्डच्या मदतीने तुम्ही सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकता. आधार कार्डवरील काही लोकांचे फोटो खराब होतात हे तुमच्या लक्षात आले असेल.

फोटो कसा बदलायचा?

अशावेळी आधारकार्ड कोणालाही दाखवायला अनेकांना लाज वाटते. ऑनलाइन माध्यमातून आधार कार्डचा फोटो कसा बदलायचा? हे जाणून घेऊया.

ऑनलाइन सुविधा

तुम्‍हाला तुमच्‍या आधारचा फोटो बदलून त्‍याच्‍या जागी दुसरा आणि चांगला फोटो घ्यायचा असेल तर ही सुविधा ऑनलाइन आहे.

फोटो बदलणे शक्य

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मदतीने तुम्ही आधारमध्ये नाव, मोबाईल नंबर, पत्ता, लिंग, जन्मतारीख आणि फोटो बदलू शकता.

UIDAI वेबसाइटवर

आधार कार्डमध्‍ये फोटो अपडेट करण्‍यासाठी सर्वप्रथम UIDAI वेबसाइटवर जा.

केंद्रात नावनोंदणी

आता आधार विभागात जाऊन आधार नोंदणी अपडेट फॉर्म डाउनलोड करा.आता फॉर्म भरा आणि कायमस्वरूपी नावनोंदणी केंद्रात सबमिट करा.

100 रुपये जमा करा

येथे तुमचे बायोमेट्रिक तपशील घेतले जातील. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 100 रुपये जमा करावे लागतील.

आधारची इमेज अपडेट

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल ज्यामध्ये URL दिली जाईल. तुम्ही हे URL वापरून अपडेट तपासू शकता. यानंतर तुमच्या आधारची इमेज अपडेट होईल.

VIEW ALL

Read Next Story